Down the Memory Valley: युक्ती

एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या बदलीच्या विरोधाला एका न्यायाधीशाने युक्तीने कसे हाताळले आणि त्याचे सकारात्मक परिणाम कसे झाले याचे वर्णन.

कर्मचारी संघटनेचा विरोध आणि बदली

वर्धा जिल्हा न्यायालय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. फिरकेंनी मा. मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय, यांना पत्र पाठवून चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या की न्यायाधीशांच्या बंगल्यावर त्यांना पाहिजे नको ते काम करावे लागते. त्याची प्रत साहजिकच वर्धा जिल्हा न्यायाधीश साहेबांनाही पाठवली होती (then PDJ terminology was yet to be introduced). त्यापूर्वी संघटनेच्या वतीने त्यांनी मे. नागपूर खंडपीठात रिट सुद्धा दाखल केली होती. ती याचिका खारीज झाली होती. असो, फिरकेंची बदली माझ्या कोर्टात, हिंगणघाटला.

असिस्टंट सुपरिंटेंडेंट, फिरकेंना माझ्या चेंबरमध्ये बदली आदेशासह घेऊन आले. नमस्काराची औपचारिकता संपल्यावर फिरके म्हणाले : सर, मी बंगल्याचे कोणतेही काम करणार नाही. मी आमच्या संघटनेचा अध्यक्ष आहे.

मी त्यांना उत्तर दिले, अरे बाबा मी तर अजून तुम्हाला कोणतेही काम सोपवले नाही, तेवढ्यातच तुम्ही असे सांगता? रजिस्टर, रोजनामे इत्यादींवर सह्यांचे काम झाल्यावर विचार केला, how to deal with this man?

न्यायाधीशांची युक्ती आणि फिरकेंची ड्युटी

डायसवर जायची वेळ झाली होती. सुधाकर वालदे दुसरे शिपाई होते. त्यांनी माझा काळा झगा (गाऊन) माझ्या अंगावर चढवायला आपल्या हातात घेतला तेव्हा मला उच्च न्यायालयातील डायस इत्यादी आठवले. ए. एस. ला बोलावून घेतले. त्यांच्या समक्ष फिरकेंना त्यांची ड्युटी सांगितली.

तुम्ही मला डायसवर न्यावे. मी डायसवर असे पावेतो तुम्ही माझ्या खुर्चीच्या डाव्या हाताशेजारी उभे राहावे. जसे उच्च न्यायालयात असते, जे तुम्ही बघितले आहे. मी डायसवरून उतरल्यानंतर तुमची ड्युटी ओव्हर. बंगल्याचे काम सोडा, बंगल्यावर माझा बस्ता देखील तुम्हाला ने-आण करायची आवश्यकता नाही. कोर्टात देखील पुकारा करायची, फाईली ने-आण करायची आवश्यकता नाही.

गडी जाम खुश झाला. हो म्हणत मला डायसवर नेले. लंच ब्रेकनंतर परत तसेच. माझ्या अपेक्षेच्या विपरीत सेकंड सेशन संपल्यावर, चेंबरमध्ये आल्याबरोबर त्यांनी विनवणी केली : सर, तुम्ही सांगाल ते काम मी करायला तयार आहे मात्र डायसवर उभे राहणे नको. मी म्हटले, तसे लिहून द्या. त्यांनी व्यवस्थित मी सांगितल्याप्रमाणे ए. एस. यांच्या हजेरीत लिहून दिले. पुढील सुमारे सव्वा दोन वर्षे, मे १९९३ मध्ये माझी गंगापूरला बदली होईपर्यंत, he was very humble and obedient. जेव्हा ही गोष्ट मी माझे जिल्हा न्यायाधीश श्री. निरखे साहेबांना सांगितली तेव्हा त्यांनी कौतुक तर केलेच, इतरांनाही ती युक्ती सांगितली.

Author Profile

I M Bohari
I M Bohari
B A, LL B

Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.