कोर्टात कर्मचाऱ्यांचे भांडण
२००६-२००८ मध्ये नागपूर येथे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून पत्रकार भवनात कार्यरत असताना, सेशन केसमध्ये पुरावा सुरू होता. दुपारचे १.४५ -१.५० वाजले असतील. तेव्हा माझ्या कोर्टातील बेंच क्लर्क श्री. भागवत आणि शिपाई बहुधा उईके जोरजोरात बाचाबाची करत कोर्टात आले. मी बेल वाजवली परंतु त्यांचा एक दुसऱ्यावरील राग कमी न होता त्याचा उद्रेक वाढतच होता. त्यांचा आवाज एवढा मोठा होता की दोन्ही बाजूच्या विंगमधील सर्व कोर्टातील लोकांनी तो ऐकला असावा. माझ्या कोर्टातील हवालदाराने शिपाईचा हात धरून, गॅलरीत नेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने हवालदारासही झिडकारले होते. भागवत डायसवर आपल्या जागी बसल्यानंतर देखील शांत झाले नव्हते. त्या लोकांची शाब्दिक दंगल सुरूच होती. साक्षीदार कठड्यात, सरकारी वकील, बचाव पक्षाचे वकील, मी स्वतः, सगळे स्तब्ध. तेवढ्यात लंच टाईम झाला.
प्र. जि. न्या. नलावडे साहेबांकडे तक्रार
मी घास भराभर तोंडात कोंबले आणि सरळ जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत, मला वाटते आठव्या मजल्यावर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब श्री. टी. व्ही. नलावडे (as then he was) साहेबांच्या चेंबरमध्ये पोहोचलो. घटना त्यांना सांगितली.
सरांनी मला विचारले, लेखी तक्रार करता? मी म्हणालो, नाही सर, मी लेखी तक्रार करणार नाही, कोर्ट कामकाज सुरू असताना हे घडले. कोर्टाचा डेकोरम ब्रीच झाला आहे. त्यांची ताबडतोब बदली शक्य असेल तर?
सरांनी म्हटले, ठीक आहे मी बघतो.
तात्काळ बदली आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’चा परिणाम
तिथून मी माझे मित्र श्री. सादिक अली साहेबांकडे गेलो. त्यांना चहाच्या खर्चात टाकले. दुपारी २.४५ च्या आत मी माझ्या चेंबरमध्ये. बघतो तर काय, माझ्या टेबलावर त्या दोन्ही महाभागांच्या बदल्यांचे आदेश. एक अख्खनला तर दुसरा दख्खनला (नागपूर जिल्ह्यातील सिमालगतच्या तालुका कोर्टात). तेही विथ इमिजिएट इफेक्ट. त्या दोघांचे स्वतःचे घर, कुटुंब नागपूरला. Thenceforth, they were holiday husbands. या ट्रान्सफर ऑर्डरचा नव्हे, तर खऱ्या अर्थाने सर्जिकल स्ट्राईकचा सॉलिड इफेक्ट बाकी स्टाफवरही झाला होता. यालाच तर म्हणत असतील, जोरका झटका, धीरेसे लगे! धन्यवाद लॉर्डशिप नलावडे सर.
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.