जेव्हा आठवणी परत येतात…
घटना म्हणे बुमरॅंग सारख्या असतात, घडुन गेल्यावर त्या परत येतात, आठवणींच्या रूपात.
वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा योग आल्याने नव नवीन लोकां सोबत ओळखी झाल्या आणि ते सर्व लोक स्मृती पटलावर कोरले गेले. फेवीकोल प्रमाणे मजबूत जोड बसायला त्यांच्या सोबत झालेली वार्ता किंवा बोलला गेलेला एखादा शब्द कारणीभूत ठरला.
सूक्ष्म कृतींची शक्ती
खरंच तर आहे, निडल ने होणारं काम तलवार, चाकु, कुर्हाडीने कसे शक्य आहे? खुर्चीची गुर्मी डोक्यात गेलेला अधिकारी कधीही लोकांचा स्नेह मिळवू शकत नाही. फिदर टच ने सुद्धा त्वरित आणि सहज काम होऊ शकते. देवापुढे आपण कुठे लाऊड स्पीकर वर मागतो!
झेरॉक्स मशीनचा चमत्कार
बहुधा २८ जुलै २०१७ . चिफ सेक्रेटरी, विधी व न्याय विभाग, मंत्रालय श्री एन पी धोटे साहेब (as then he was) यांचा वाढदिवस होता. सकाळी त्यांना शुभेच्छा मेसेज दिला. नंतर कोर्टात गेलो. कौ न्या नागपूर. कोपीईंगचे जबरदस्त काम साचलेले. आऊट सोर्सींगचे झेरोक्स मशीन बिघडले. कधी दुरुस्त होईल माहीत नाही. कोर्ट मेनेजर, रजीस्टार, कोपीईंग क्लर्क माझ्या कडे आले. नवीन मशीन घेण्याची कल्पना सुचली. शासनाकडून त्यासाठी त्वरित पैसे मिळणे अशक्य.
त्वरित धोटे साहेबांना फोन केला आणि परत एकदा हेपी बर्थ सांगून रिटर्न गिफ्ट मागितली. ते म्हणाले, काय पाहिजे? मी म्हणालो, झेरॉक्स मशीन. धोटे साहेबांनी सांगितले पेपर, कोटेशनस पाठवा, बघतो. एक तासात पाहीजे ते कागदपत्रे सर्वोत्कृष्ट झेरॉक्स मशीन साठी ईमेल ने पाठवले. न भुतो, न भविष्यती, दुपारी चार साडेचार च्या आसपास अप्रुव्हल. दुसऱ्या दिवशी एकदम लेटेस्ट, सुपर फास्ट, मल्टी फंक्शनल झेरॉक्स मशीन आमच्या कोर्टात. सातव्या आठव्या दिवशी पैसे डिलर च्या खात्यात. धन्यवाद लोर्डशिप धोटे सर.
एक सुखद दूरध्वनी भेट
जाता जाता, जुन २००० मध्ये पाली वरून माझे सहकारी ए एम थोरात डहाणुला बदली होऊन आले होते. काही कारणास्तव तिथल्या ए एस चा फोन आला. त्यांनी मला विचारले : बोहरी साहेब बोलताय ना? मी होय म्हणून ऊत्तर देत त्यांना विचारले आपण कोण? त्या म्हणाल्या, सर,मी पाली कोर्टातुन ए एस मिसेस गुंड. लगेच मी त्यांना सांगितले, आवाजा वरून तर तसं वाटत नाही त्या हसल्या आणि पहील्या टेलीफोनीक भेटीतच खुप पुर्वी पासुन ओळख असल्या सारख्या बोलल्या.
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.