Down the Memory Lane: गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा

कधीकधी काही घटना आपल्याला जीवनाच्या खोल अर्थाची जाणीव करून देतात. अशीच एक घटना नागपूरमधील आहे, जिथे “गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा” या गाण्याचा सार्थक अनुभव मिळाला.

गुपचूप विक्रेत्याची केस आणि न्यायाचा वेग

2005-2008 या कालावधीत मी नागपूर येथे तदर्थ सत्र न्यायाधीश होतो. न्यायाधीशांच्या दैनंदिन गप्पांमध्ये अनेक वेगवेगळ्या अनुभवांची देवाण-घेवाण होत असे. त्या काळात श्री. प्रकाश जयस्वाल हे एक अनुभवी वकील होते, आणि त्यांच्या एका विशिष्ट केसने माझ्या मनात घर केले.

ही केस एका गुपचूप (पाणीपुरी) विक्रेत्या बद्दल होती, जो एका रेप प्रकरणात आरोपी होता. केस अंडर ट्रायल होती आणि बचाव पक्षाने जामिनासाठी अर्ज केला होता. पीडिता गर्भवती होती आणि आपल्या पालकांसह न्यायालयात उपस्थित होती. आरोपी हा दुसऱ्या राज्याचा रहिवासी असल्याने मी केस लवकर निकाली काढण्याचा सल्ला दिला.

बचाव पक्षाने वैद्यकीय अहवाल आणि पंचनामा लगेच मान्य केला. तपास अधिकाऱ्यांची जबानी आणि सरकारी वकिलांची उपस्थिती असल्याने, आरोपी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आणि त्याच दिवशी त्याला सोडण्यात आले. विशेष म्हणजे, काही काळानंतर आरोपी आणि पीडितेचे लग्न झाले.

या केसचे वेगळेपण म्हणजे – आरोपीने ज्या वकिलांना आपल्या बचावासाठी निवडले होते, त्यांची फी त्याच्या पत्नीने चिल्लर स्वरूपात भरायचा प्रयत्न केला. मात्र, श्री. प्रकाश जयस्वाल यांनी एक रुपयाही स्वीकारला नाही.


न्यायासाठी मदतीचा हात आणि तातडीचा निर्णय

ही केस मी जवळपास विसरून गेलो होतो, पण 2022 मध्ये मुंबईला MERC मध्ये असताना मला एक SOS कॉल आला आणि पुन्हा या घटनेची आठवण झाली.

शहादा येथील हकीमुद्दीन भाई कादीयानी (वय 80) आपल्या पत्नी आणि मुलासह जबलपूरला मुलीला भेटायला ट्रेनने जात असताना, नागपूर जवळ त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

त्यांची मृतदेह नागपूरमध्ये उतरवून पोस्टमार्टम करण्यात आले, पण रेल्वे पोलिस मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करायला तयार नव्हते. तब्बल 12-13 तास कुटुंबीय धावपळ करत होते, पण तोडगा निघत नव्हता.

तेव्हा कुटुंबातील एका भावाला माझी आठवण झाली आणि त्याने मला फोन केला. मी लगेच श्री. प्रकाश जयस्वाल यांना संपर्क केला. अवघ्या काही मिनिटांत त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. दहाव्या मिनिटाला एम्ब्युलन्स शहादा साठी रवाना झाली.

दुर्दैवाने, एका महिन्यातच करोनाने त्या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलालाही गिळंकृत केले.


सेवा आणि माणुसकीचा धडा

या प्रसंगानंतर जयस्वाल सरांशी बोलताना त्यांनी गुपचूप केस आठवली आणि म्हणाले –

“Sir, वो गुपचूप वाली केस आपने जीस तरह से चलायी थी, तो मेरा भी फर्ज बनता था की मै भी ऊसी तरह फास्ट काम करु!”

तेव्हा मला कळून चुकले – आपली वर्तणूक पारदर्शक असेल, तरच लोक आपल्याला मान देतील. गरीबांचे ऐका, ते नक्कीच तुमचे ऐकतील.

आज डिजिटल क्रांतीमुळे काही मिनिटांत निर्णय घेता येतो, पण एक काळ होता जेव्हा BSNLच्या ordinary, urgent, lightning call सेवांवर अवलंबून राहावे लागायचे. त्याही आधी कबुतर पाठवण्याचा जमाना होता!

धन्यवाद, प्रकाश जयस्वाल सर, तुमच्या अमूल्य सेवेबद्दल!

Author Profile

I M Bohari
I M Bohari
B A, LL B

Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.