Down the Memory Lane: A Stitch In Time Saves Nine

वेळेवर घेतलेला योग्य निर्णय कसा फायदेशीर ठरतो याचे वर्णन. एका न्यायाधीशाच्या अनुभवातून त्यांनी आपल्याच समाजाच्या खटल्यांपासून दूर राहून संभाव्य आरोपांपासून स्वतःचा बचाव कसा केला याचे वर्णन आहे.

न्यायाधीशांची नैतिकता आणि कर्तव्य

मा. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात नातेवाईक किंवा जवळच्या परिचिताची किंवा वकिली काळातील पक्षकाराची केस आल्यास फक्त तीन शब्द Not before me आणि ती केस इतर बेंचकडे.

जिल्हा, तालुका पातळीवरील अशा केसेससाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना विनंती अर्ज पाठवावा लागतो.

डहाणू येथील अनुभव आणि प्र जि न्या सुहास बर्वे साहेबांचे पत्र

जून २००० मध्ये डहाणू येथे जेव्हा माझी बदली तिथल्या तिथे, दोन नंबर कोर्टातून एक नंबरच्या कोर्टात झाली तेव्हा माझ्या लक्षात आले की बोहरी समाजाच्या लोकांचे बरेच आर्थिक किंवा घरमालक-भाडेकरू स्वरूपाचे दावे त्या ठिकाणी प्रलंबित होते. तसे बघितले तर बोहरी लोक कोर्ट कचेरीपासून खूप लांब राहणारे लोक आहेत. Exception proves the rule नुसार डहाणू कदाचित त्याला अपवाद असावा. असो, मी त्याबाबतीत काही विचार करण्या अगोदर मला आमचे प्र. जि. न्या. श्री. सुहास बर्वे साहेबांचे पत्र मिळाले. त्यांचा आदेश होता की मी माझ्या कोर्टातील पन्नास दावे कोर्ट नंबर दोनमध्ये ट्रान्स्फर करावे. साक्षात परमेश्वर माझ्या मदतीला धावून आल्याचा साक्षात्कार मला झाला.

लगेच बेंच क्लर्क सौ. देसाई आणि असी. बेंच क्लर्क सोबत माझ्या कोर्टातील सर्वच्या सर्व दाव्यांमधील पक्षकारांची नावे तपासून पाहिली आणि बोहरी लोकांचे एकूण एक दावे वेगळे केले. त्यातील काही निकालासाठी जवळच्या भविष्यात तयार होणारे ही दावे होते. परंतु मी त्याची पर्वा केली नाही. पन्नासचा आकडा पूर्ण करण्यासाठी इतर ही दावे त्यात मिळवले आणि हु हु ची पु पु (हुजुरांच्या हुकुमाची पूर्ण पूर्तता) केली.

निनावी तक्रार आणि वेळेवर घेतलेला निर्णय

थोड्याच दिवसात माझ्या विरुद्ध एक निनावी तक्रार मे उच्च न्यायालयात केली गेली. मी बोहरी लोकांच्या बाजूने निकाल देतो इत्यादी आरोप केले गेले होते. श्री. बोरीकर सरांना (ADJ Palghar) चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. दुर्दैवाने त्या निनावी तक्रारकर्त्यास दावे ट्रान्सफर्डची माहिती नसल्याने तो तोंडघशी पडला होता. यालाच तर म्हणतात a stitch in time saves nine.

ट्रान्सफर ऑफ केसेस आणि न्यायाधीशांची भूमिका

ट्रान्सफर ऑफ केसेसवरून एक सुंदर आठवण: नागपूर येथे एका वर्कशॉपमध्ये माननीय प्र. जि. न्या. श्री. टी. व्ही. नलावडे (as then he was) साहेबांचे शब्द आम्हा लोकांवर काय मस्त जादू करून गेले होते: तुमच्या कोणाकडेही डोकेदुखीची केस, अपील, इत्यादी असेल तर जस्ट मला एका ओळीचे पत्र पाठवा. तोंडी सांगितले तरी चालेल. मी ते प्रकरण माझ्याकडे ट्रान्सफर करून घेईन. अनेक युद्धे, केवळ सेनापतीच्या दुर्दम्य, fight from the front attitude मुळे जिंकली गेली आहेत.

सिनेमा आणि न्यायदान

जाता जाता, कदाचित मराठी सिनेमाबद्दल. मी सौ. शालिनी फळसनकर जोशी, डायरेक्टर (as then she was) जुडिशिअल अकादमी, उत्थान यांना सांगितले की या सिनेमाची कॅसेट अकादमीमध्ये असायला पाहिजे आणि तो सिनेमा प्रत्येक जज्जने पाहिलाच पाहिजे असा आहे. It’s a Bible on Benefit of Doubt Theory. त्यांनी लगेच केसेट मागवली, बघितली आणि आमच्या बॅचच्या लोकांना तो सिनेमा बघायला लावला. नंतरच्या जजेससाठी, आजही ती कॅसेट अकादमीत उपलब्ध असावी. आपण लोकांनी जर अजून कदाचित पाहिला नसेल तर ….

Author Profile

I M Bohari
I M Bohari
B A, LL B

Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.