नंदू फडके साहेबांची विद्वत्ता आणि ‘मेमरी व्हॅली’
सीनियर ॲडव्होकेट श्री. नंदू फडके साहेब (पुणे) हे एक असे विद्वान आहेत की त्यांना एकदा ऐकले की विसरणे कठीण, नव्हे अशक्य आहे. ते सकारात्मक व्यसनापेक्षा कमी नाहीत. मला आठवते, ते आणि कै. प्रमोद महाजन साहेब बॅचमेट होते. काल त्यांनी सूचना केली की मी माझ्या लेखनाचे शीर्षक डाऊन दि मेमरी व्हॅली असे बदलावे कारण, आणि मी त्यांचेच शब्द उद्धृत करतो: After taking into consideration the treasure of your experience, the preferable suitable caption will be……. Instead of ” Down the Memory Lane “
Not at all
Passage is narrow pathway.
Valley is wide and deep
consisting of
Natural beautiful things like
Rivers
Flowers
Shrubs
Trees
Greenery
Hills
Mountains
Treads
Birds
Springs
And
Feathers of peacocks
” Down the Memory Valley “ माझ्या प्रश्नावर, खरंच त्यांनी मला लेखन थांबवावे असे वाटत आहे का?
त्यांनी स्पष्ट केले, आणि पुन्हा मी त्यांचेच शब्द उद्धृत करतो: Not at all Passage is narrow pathway. Valley is wide and deep consisting of Natural beautiful things like Rivers Flowers Shrubs Trees Greenery Hills Mountains Treads Birds Springs And Feathers of peacocks
सबब त्यांची सूचना वजा आदेश शिरसावंद्य मानून आजपासून माझ्या लिखाणाचा मथळा डाऊन दि मेमरी व्हॅली.
चक्काजाम आणि कोर्टातील तयारी
रोजच्या कामकाजात आपण वर्तमानपत्रे, बातम्या वाचून जगाशी संपर्क ठेवत असतो. काही बाबी अशा असतात की त्यांची त्वरित दखल घेणे गरजेचे असते.
मी १९९७-१९९९ मध्ये नांदुऱ्याला कार्यरत होतो. बातमी वाचली की भारतरत्न चौधरी चरणसिंग साहेबांनी शेतमालाची किंमत इत्यादी मागण्यांसाठी अमुक एके दिवशी भारतभर चक्काजाम करणार. कोर्टात गेल्यावर मी माझ्या डायसवरून सिव्हिल आणि फौजदारी जंत्री मागवून घेतल्या. चक्काजामचा दिवस कोर्ट वर्किंग डे होता. त्या दिवसाच्या पानांवर मी तांबड्या शाईने क्रॉसची लाईन मारली आणि बोल्ड अक्षरांत चक्काजाम लिहिले की जेणेकरून त्या दिवसासाठीची तारीख एकाही केसमध्ये दिली जाऊ नये. पुराव्याच्या केसेसच्या तारखा दिल्यानंतर त्या केसेसचे नंबर मी स्वतः जंत्रीमध्ये लिहीत असे जेणेकरून माझ्या कारकिर्दीत असे कधीही झाले नाही की बोर्डवर एखाद्या दिवशी दोनशे केसेस आणि एखाद्या दिवशी दोन तीन. याचा फायदा मला तेव्हा मिळाला जेव्हा चक्काजामच्या दिवशी बुलढाणा पी. डी. जे. माननीय टी. व्ही. नलावडे (as then he was) साहेबांनी, बुलढाण्याला रुजू झाल्यावर पहिल्यांदा सर्व तालुका कोर्टात (मेहकर, चिखली, खामगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर) सरप्राईज व्हिজিটस दिल्या. चक्काजाम बंदोबस्तात पोलीस बिझी, बसेस बंद, रस्ते सामसुम. सगळ्या कोर्टात कर्फ्यू लाईक शांतता.
प्र. जि. न्या. नलावडे साहेबांची नांदुऱ्याला भेट
नांदुऱ्याला भाड्याच्या घरात कोर्टे होते. कोर्ट हॉलसमोर पोर्च. मी डायसवर. दुपारी १.४५ च्या सुमारास पोर्चमध्ये सरांची ॲम्बेसेडर थांबली. सर चेंबरमध्ये गेले. माझा डेली बोर्ड मागवला. त्यावर फक्त एक केस. वाटलं आता आपली खैर नाही. दोन वाजता मी डायसवरून उतरलो. चेंबरमध्ये गेलो. एकच केस बोर्डावर का, याचा खुलासा केला. सर म्हणाले अहो बोहरी साहेब, केस मॅनेजमेंट, हेच तर महत्त्वाचे आहे. मी इतर कोर्टात जाऊन आलो. बोर्डावर भरपूर केसेस, मात्र तिथे चिटपाखरूही दिसून आले नाही. एकंदरीत, नांदुऱ्याहून सर हेप्पी नोटवर पुढे मलकापूरच्या दिशेने रवाना झाले.
अन्न व औषध कायद्याखालील केस आणि चक्काजामचा फायदा
नांदुरा कोर्टात एका आरोपीवर फूड ॲण्ड ड्रग्स ॲक्ट खालील केस पुराव्यावर होती. फिर्यादी फूड इन्स्पेक्टरची बदली मराठवाड्यात लांबच्या ठिकाणी, बहुधा बीडला झालेली होती. बेलेबल वॉरंटवर ते तारखेला आले होते परंतु पुरावा द्यायची तयारी नव्हती. तारीख मागितली. आरोपीचे वकील श्री. शाह (बहुधा “एस. जे.”) मलकापूरहून यायचे. त्यांची हरकत नव्हती. फिर्यादीचे मागे मोठे ॲक्सिडेंट झाले होते. त्यांना खाजगी वाहनानेच प्रवास शक्य असायचा. सबब चक्काजामच्याच दिवसाची तारीख दिली. त्या दिवशी तेवढी एकच केस माझ्या डायसवर होती. तिचे काम सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० ते ५ पर्यंत (मायनस लंच टाईम) चालल्याचे आठवते. फूड केसमध्ये पुरावा भैरवीसारखा असतो, दोन ओळीचे गीत मात्र आलाप पंधरा मिनिटांचा. तसेच फूड केसमध्ये सरतपास तीन चार तासांचा तर उलट तपास केवळ अर्ध्या तासाचा.
त्या दिवशी मिळालेल्या शांततेमुळे स्टाफच्या लोकांनी डिक्री, मोस्तर, कामगिरी, स्टेटमेंट इत्यादी कितीतरी कामे भराभर उरकून घेतली होती. मला मात्र त्या दिवशी जॅकपॉटच लागला होता तो नलावडे सरांच्या सरप्राईज व्हिজিটचा म्हणतात ना की your first impression is last impression. सरांनी परत कधीही नांदुऱ्याला सरप्राईज व्हिজিট दिली नव्हती. पुढे नागपूरलाही मला त्यांच्या हाताखाली काम करण्याचे सौभाग्य लाभले होते. तेव्हा तर त्यांनी मला, मी खूप ज्युनियर असतानाही रिक्रुटमेंट कमिटीवर घेतले होते, इतर काही कोर्टांचे इन्स्पेक्शन कंप्लायन्स व्हेरिफिकेशनचेही काम दिले होते. खरोखर, रम्य त्या आठवणी. In short, Thank you Chakkajaam.
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.