Down the Memory Lane: Tattoo

"त्याच्या बाहेवर तिचा चेहरा, तिच्या बाहेवर त्याचा चेहरा... पण मनात एकमेकांसाठी जागा उरली नव्हती!" - आधुनिक नातेसंबंधांवर टाटूंच्या सह्यात लिहिलेली ही विनोदी तरी विचारवंत करणारी कहाणी.

“चट शादी, पट तलाक” – बदलत्या विवाह संस्थेची कहाणी

२०१४-२०१५ च्या सुमारास मुंबई कौटुंबिक न्यायालयात असतानाची ही घटना, माझ्या आठवणीत, काल परवा घडल्यासारखी ताजी टवटवीत आहे.

डायव्होर्स बाय म्युच्युअल कन्सेंटचा अर्ज दाखल झाल्यावर उभयतांना सहा महिन्याची तारीख दिली जाते. त्या काळादरम्यान परत सुलह करण्याची, एकत्र नांदण्याची संधी मिळते. परंतु माझ्या बघण्यात आले आहे की क्वचित एखाद्या केसमध्ये तसे घडते. आता तर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, जर पुलाखालून बरेच गढूळ पाणी वाहून गेले असेल, समझोता एक्सप्रेसची किंचितही शक्यता नसेल तर तो सहा महिन्याचा कूलिंग पीरियड देखील माफ केला जाऊन, फास्ट फूड प्रमाणे फास्ट डायव्होर्स शक्य झाले आहे.

पंजाबी, उच्चशिक्षित, दोन मुले (आठ-दहा, सहा-सात वर्ष वय) असलेला अक्षरशः लक्ष्मीनारायणाचा जोडा, सहा महिन्यानंतरच्या तारखेवर माझ्यासमोर हजर झाला. दोन्ही ढगळे टी-शर्ट घालून होते. आपापले शपथपत्र मला डायसवर देताना, त्याच्या टी-शर्टची उजवी बाही वर सरकल्यामुळे त्याच्या उजव्या बाहूवरील काळी आकृती मला दिसली.

शपथपत्र वाचल्यानंतर मी त्याला हाताने माझ्या बाहूकडे इशारा करून विचारले की: “आपकी बांह पर क्या है?” त्याने लगेच आपली उजवी बाही वर करून, त्याच्या दंडावरील टॅटू दाखवला. मी आश्चर्यचकित झालो. तिचा चेहरा, त्याच्या बाहूवर टॅटूमध्ये हुबेहूब कोरलेला/चितारलेला/रंगवलेला होता.

मी तिला सांगितले: “देखो, ईनको आपसे कितना प्यार है. कितने जतन से ऊन्हेाने आपको अपनी बांह पर बिठा रख्खा है. Why insisting for divorce? बच्चों का तो सोचो!”

शॉकही एकावर एक फ्री मिळतात की काय? दुसरा आश्चर्याचा झटका मला तिथेच मिळाला. तिनेही लगेच आपल्या टी-शर्टची एक बाही वर करून तो तिच्या दंडावर विराजमान झालेला दाखवला. तोही टॅटू, त्याचा चेहरा स्कॅन करून तिच्या दंडावर उमटवला गेला असावा, एवढा अप्रतिम.

काय बोलावे? मला सुचेना. माझी बोलती बंद. ऑफ स्टंप बाहेरील चेंडू सोडलेलाच बरा. नाहीतर विराट व्हायला वेळ लागत नाही. लोकांची मानसिकता बदलली आहे. सहनशक्ती नाहीशी झालेली आहे. विवाह संस्था ही ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मॅच होण्याच्या मार्गावर लागली आहे. “कालाय तौस्मय नम:”! “चट मंगनी, पट शादी” च्या जागी आता नवी म्हण “चट शादी, पट तलाक”, खास करून मोठ्या शहरांमध्ये अनुभवायला मिळते.

न राहवून, सपना वासूच्या जोड्याला मी विचारले: “शादी तो खतम हो जायेगी. मगर अब टॅटू कैसे मिटाओगे?”

ती घाईत दिसली. लगेच म्हणाली: “सर, वो भी मिट जायेगा लेकीन ऊसका खर्चा टॅटू कराने से डबल लगता है.”

काय सांगू? “चट मंगनी, पट शादी” च्या जमान्यात “चट शादी, पट तलाक” हे नवे सूत्र रूढ झाले आहे. आजच्या तरुणांसाठी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटसारखी लग्नं आणि सोशल मीडिया स्टोरीजसारखे तलाक!

४. शेवटचा विचार

टाटू तर काढता येतील, पण विवाहबाह्य नात्यांच्या खोल खुणा मात्र मनावर कायम ठसतात. “कालाय तस्मै नमः” – बदलत्या काळाला नमस्कार!

Next Story: १९९६ मधील मलकापूरची एक भावनिक घटना… जी याच्या अगदी उलट होती!

Author Profile

I M Bohari
I M Bohari
B A, LL B

Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.